Sunita Mudaliar Executive Editor
How many people had even heard of Dadaji Khobragade, till he passed away recently?Not many, I am sure. Belonging to an agricultural family, and being a...
डॉ धनराज खानोरकर
सोमवारला संशोधक दादाजी खोब्रागडेंना त्यांच्याच शेतात मुलगा मिञदीपांनी, मुलगी वीणा यांनी असंख्य जनसमुदायासमोर दादाला चिताग्नी दिला . एका सर्वोत्तम ध्यासपर्वाचा अंत...
महेश उपदेव
विदर्भातील एका छोट्या गावात राहणारे दादाजी खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने कृषी संशोधक होते. एचएमटी तांदळाचे जनक असलेले दादाजी यांनी ‘एचएमटीवाले’ ही ओळखच त्यांच्या कृषी संशोधनाच्या कामाची...
एचएमटी भाताचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सांयकाळी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. या संशोधकाला २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. परंतु यावेळी देण्यात आलेल्या...
देवनाथ गंडाटे
दादाजी खोब्रागडे म्हणजे एका माणसाचं कृषी विद्यापीठच. जिज्ञासा आणि संशोधनासाठी वय अथवा शिक्षणाचा काहीच संबंध नसतो, हे दादाजींनी दाखवून दिले. तिसरा वर्ग शिकलेल्या दादाजींनी...
प्रशांत ननावरे
बीबीसी मराठी
"बाबाजींनी 9 वाण शोधून काढले पण आजही आम्हाला त्यांची पेटंट किंवा रॉयल्टी मिळत नाही. नुसत्या पुरस्कारानं पोट भरत नाही. शेवटच्या आजारपणातही...
फोर्ब्सलाही आपल्या कृषी संशोधनाने दखल घ्यायला भाग पाडणारे एचएमटी भात आदी वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील महिनाभरापासून ते आजारी होते. 'सर्च' रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ७९ वर्षांचे होते.
तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील 'सर्च'मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते. नांदेड येथे राहून कृषी क्षेत्रात नवनवे सकारात्मक बदल करीत असतानाच त्यांना अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासले. त्यानंतर चार महिने त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर माध्यमांनी त्यांच्या या दुर्दशेवर सरकारचे लक्ष वेधले. राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांची आर्थिक मदत केली होती.
दरम्यान, सर्च या संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी दादाजी खोब्रागडे यांना सर्च येथील रुग्णालयात दाखल करुन घेतले होते. तिथे मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दहा-बारा दिवसांपूर्वीच त्यांनी जेवण बंद केले होते. त्यांना बोलणेही शक्य होत नव्हत. त्यांची प्रकृती रविवारी सायंकाळी चांगलीच खालावली. उपचारादरम्यान सायंकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ४ जूनला दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे नेले जाणार आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शोकसभा
तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदनेत दादाजींच्या अंत्यविधीच्या वेळी शोकसभेत व्यक्त केल्या.
धानाच्या या एचएमटी वाणाने देशातील सर्व धान पिकाचे विक्रम मोडून काढले. एवढेच नव्हे तर विदेशातही या वाणाचे पीक घेतल्या जात आहे. दादाजींच्या संशोधनाची फोर्ब्स या जागतिक संस्थेने दखल घेतली व जगातील १० शक्तीशाली उद्योजकांच्या यादीत दादाजींना स्थान दिले. यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. दादाजींचे हे कार्य विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या संशोधकांनाही लाजवणारे आहे. मात्र महाराष्ट्रात दादाजींच्या संशोधनाची उपेक्षाच झाली आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या शोकसभेत उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, अॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रफुल्ल खापर्डे, वसंत वारजुकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे, बीआरएसपीचे राजू झोडे यांनीही दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दादाजींना एचएमटी या धानाच्या वाणाचे पेटंट मिळायला पाहिजे. दादाजीने आडवळनावरील एका खेड्यात राहून जे संशोधन केले, त्याला तोड नाही. या वाणाने अनेकांना श्रीमंती प्राप्त झाली. मात्र दादाजी शेवटपर्यंत जसा होता तसाच राहिला, असे विचार मांडले.